
मुंबईतील रिक्त झालेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदाच्या आठ जागा भरण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता या जागा तीन महिन्यांसाठी भरण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मे महिन्यात बरेच एसीपी सेवानिवृत्त झाल्याने शहरातील एसीपींचे आठ विभाग रिक्त झाले होते. सद्य परिस्थिती पाहता या जागा तत्काळ भरणे गरजेचे असल्याने पोलीस आयुक्तांनी आठ एसीपींची त्या रिक्त जागी तीन महिन्यांकरिता नियुक्ती केली आहे. त्यानुसार आनंद नेर्लेकर (घाटकोपर विभाग), सुरेखा कपिले (भांडुप विभाग), वसंत पिंगळे (वांद्रे), नीता फडके (माटुंगा विभाग), अरुंधती राणे (माहीम विभाग), अरविंद वाढणकर (विक्रोळी विभाग), जयप्रकाश भोसले (सांताक्रुझ विभाग), मुकुंद पवार (साकीनाका विभाग) यांचा समावेश आहे.




























































