आंतरजिल्हा प्रवासासाठी वर्गवारीनुसार ई-पास, लेव्हल पाच असलेल्या जिल्ह्यातील प्रवासाला पास गरजेचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येच्या टक्केवारीनुसार शासनाकडून एक ते पाच विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरजिल्हा प्रवासासाठी एक ते चार वर्गवारीत ई-पासची आवश्यकता नसल्याी माहिती पुणे पोलिस प्रशासनाने दिली आहे. मात्र, लेव्हल पाचमध्ये असलेल्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.

विविध जिल्ह्यातील रूग्णसंख्येच्या वर्गवारीनुसार ई-पास मंजूर करण्यात येणार आहे. त्यानुसार कोरोना रूग्णसंख्या लेव्हल पाचमधील जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ई-पास काढावा लागणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना संबंधित जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्येची माहिती घेउन ई-पास काढावा. विनाकारण प्रवास करू नये, कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ई-पासेस यंत्रणा सुरू आहे.