देशाला पुन्हा खंबीरपणे उभा राहणाऱया काँग्रेसची गरज, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या भाजपला कोणताही मजबूत राजकीय पर्याय नाही. ही पोकळी काँग्रेस भरू शकते. काँग्रेस आजही एक शक्ती आहे, परंतु पक्षाला सुस्ती आल्याचे चित्र हटवण्यासाठी संघटनात्मक सर्व स्तरांवर काम करावे लागेल, व्यापक सुधारणा करावी लागेल. देशाला पुन्हा खंबीरपणे उभा राहणाऱया काँग्रेसची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी केले.

मोदी सरकारने नैतिक अधिकार गमावला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचा सध्याचा दृष्टिकोन पाहता भाजपला काँग्रेस एक मजबूत राजकीय पर्याय ठरू शकतो, असे सिब्बल म्हणाले. पक्षाला निवडणूक रणनीती बनवण्यासाठी योग्य लोकांची गरज आहे. काही युवा नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष सोडून जात असल्याचा टोला त्यांनी जितीन प्रसाद आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना लगावला.