
रेल्वेने प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक या दोन्हीमध्ये अधिक गती मिळविण्यासाठी देखभालीची अत्याधुनिक साधने स्कीकारली आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे विभागात टॅम्पिंग मशीनद्वारे मागील वर्षभरात तीन हजार किलोमीटरच्या रुळांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. रेल्वे रुळाची गती आणि लोडिंग क्षमतेत नवीन परिमाण कायम ठेवण्यासाठी रेल्वेने आपला ट्रॅक मजबूत केला आहे. देखभाल करण्यासाठी ट्रॅकमॅनच्या कठोर मेहनतीसह अत्याधुनिक मशीनदेखील वापरल्या जात आहेत.
रेल्वेमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वांत आधुनिक मशीनसह सोलापूर विभागाने ट्रॅक स्टेबलायझर वापरण्यास सुरुवात केली आहे. जो रेल्वेतील सर्वांत उच्च तंत्रज्ञानाचा वापरण्यात येत असलेला महत्त्वाचा पुरावा आहे. त्याचप्रमाणे सोलापूर रेल्वे विभागात पाच टॅम्पिंग मशीन वापरली जात आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये टॅम्पिंग मशीनसह वर्षाला तीन हजार कि.मी. रुळांची देखभाल केली जात आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मानकांच्या ट्रॅकचे वजनदेखील अधिक आहे आणि रुळांची (रेलची) लांबीदेखील जास्त आहे. गाडय़ांचा वेग वाढल्यामुळे ट्रॅकचे पॅकिंगदेखील उच्च पातळीकर आणि अंतरावर केले जाते. संरेखन आणि रेखांशाचा स्तर या दृष्टीने दुरुस्त करावा लागत आहे. या सर्व गरजा लक्षात घेऊन रेल्वेकडून अत्याधुनिक टॅम्पिंग मशीनचा वापर करून सोलापूर विभागात रुळांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे मशीनद्वारे केली जात आहेत.
टॅम्पिंग मशीनचा फायदा
उच्च तंत्रज्ञानाच्या कापरामुळे वेग वाढण्यास मदत होते. देखभालीचा खर्च कमी, दुरुस्तीसाठी टॅम्पिंग मशीन बऱ्य़ाच काळासाठी ठेवता येतात. मशीनचे आयुष्य 15 ते 20 वर्षांपर्यंतचे असते. उच्च विश्वासार्हता, धारणा आणि ट्रॅकची सुरक्षा सुनिश्चित करते.
सोलापूर विभागात सध्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी विभागात आर 260 मीटर लांबीच्या रुळांचा वापर केला जात आहे. जेणेकरून रूळ आर 260 मीटर लांबीचे असल्यामुळे वेल्डिंग जॉइंटची संख्या कमी होईल. जॉइंटची संख्या कमी झाल्याने रेल फ्रॅक्चर कमी होतील. आर 260 मीटर लांबीचे रूळ सक्षम असणार आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रवासी गाड्या व मालवाहतूक गाड्या आता अधिक क्षमतेने धावण्यास सोयीचे होणार आहे.



























































