
ट्रू कॉलर अॅपने अँड्रॉईड युजरसाठी कॉलिंग आणि मॅसेजशी संबंधित तीन नवीन फिचरची घोषणा केली आहे. ग्रुप व्हॉईस कॉल, इनबॉक्स क्लिनर आणि स्मार्ट एसएमएस असे हे फिचर आहेत. ग्रुप व्हॉईस कॉल फिचरमुळे एकाच वेळी आठ जणांशी गप्पा मारता येतील.
विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीचा नंबर आपल्या फोनबुकमध्ये सेव्ह नसेल तरीही त्या व्यक्तीशी या फिचरमुळे गप्पा मारता येतील. स्मार्ट एसएमएस फिचरमुळे युजर मॅसेजला ऑर्गनाईज करू शकतात, तर इनबॉक्स क्लिनर या फिचरमुळे अनावश्यक असलेले मॅसेज डिलीट करून फोनची मेमरी रिकामी करता येईल. स्पॅम मॅसेजदेखील एका झटक्यात डिलीट करता येतील.
























































