रत्नागिरीत लॉकडाऊननंतरही कोरोनाचा कहर सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ratnagiri-railway-station

गेले दोन महिने जिह्यात लॉकडाऊन पाळूनही कोरोनाचे रुग्ण कमी न होता वाढत आहेत. त्याचबरोबर मृत्यूदरातही वाढ होत आहे. याची गंभीर दखल राज्यसरकारने घेतली असून 21 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे रत्नागिरीत येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या परिस्थितीवर आढावा बैठक होणार आहे.

सध्या रत्नागिरी जिल्हा चौथ्या स्तरामध्ये असल्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना 9 ते 4 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र अन्य व्यवसायांवर निर्बंध असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. जिह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 14 टक्क्यांच्या घरात आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांची संख्या वाढली आहे. मृत्यूदरही 3.40 टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. या सर्व घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे 21 जून रोजी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे रत्नागिरीत येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱयांसमोर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे चर्चा करणार आहेत.