शाळकरी मुलांचे वाढवतात मनोबल, दोन किशोरवयीन मुलींचे कौतुकास्पद काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादच्या रिया ठक्कल आणि अंकिता रेड्डी… जेमतेम 16 वर्षांच्या… लहान वयात मोठी कामगिरी करून दोघी चर्चेत आल्या आहेत. दोघींनी दोन वर्षांपूर्वी ‘विश्वास’ या एनजीओची स्थापना केली. एनजीओच्या माध्यमातून दोघी सरकारी शाळांमध्ये आणि अनाथाश्रमांमध्ये जाऊन तिथल्या मुलामुलींच्या मानसिक स्वास्थासाठी काम करतात. मुलामुलींमध्ये विश्वास जागवतात.

सुरुवातीला एनजीओच्या निमित्ताने अनेक सरकारी शाळांमध्ये मुलाखती घेतल्यानंतर रिया ठक्कल आणि अंकिता रेड्डी यांच्या असं लक्षात आलं की तिथली मुले आपल्या ध्येयाबद्दल साशंक आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास कमी आहे. या मुलांना प्रोत्साहन देण्याचे रिया-अंकिताने ठरवले. याशिवाय एकाग्रता, लिंग समानता असे विषयही प्रशिक्षणात अंतर्भूत केले.

लॉकडाऊनमध्ये काम सुरू

विश्वास’च्या कामात लॉकडाऊनमध्ये खंड पडला नाही. प्रत्यक्ष शाळांमध्ये, अनाथाश्रमांमध्ये जाता येत नसल्याने दोघींनी मानसिक स्वास्थ, तणावमुक्ती तसेच अन्य लाईफ स्कीलचे क्हिडियो तयार केले. इंग्लिश आणि तेलगू भाषेतील हे व्हिडियो शाळांमध्ये पाठवले. हैदराबादमधील 250 मुलांसाठी विश्वास व्हिडियो पाठवले, असे अंकिता रेड्डीने सांगितले.