कोरोनाबाबत जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीबाबत ‘बूम लाईव्ह’च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा आणि जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच ‘कोविड-19 योग्य वागणे म्हणजे काय’ यावर पाच माहितीजन्य लघुपट दाखवले जाणार आहेत.

संपूर्ण जग रविवारी कोरोना महामारीशी लढत आहे. सध्या डिजिटल माध्यमांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडत असून त्याचा मोठा परिणाम ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्यासाठी ‘बूम’ देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था, त्यांची व्यासपीठे आणि संघटना यांच्यासोबत भागीदारी करून विनामूल्य ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करणार आहे. या कार्यशाळेचे आयोजन करू इच्छितात त्यांनी 7700906111 या क्रमांकावर संपर्क साधावा.

खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने हेल्प युवरसेल्फ फाऊंडेशन आणि रिझवी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मुंबई पोलिसांच्या कुटुंबीयांकरिता मोफत कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वांद्रे डीसीपी अभिषेक त्रिमुखे, अॅडव्होकेट रुबिना अख्तर हसन रिझवी, डॉ. अख्तार हसन रिझवी आणि आदी मान्यवर उपस्थित होते.