
महाराष्ट्रासह मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या घटत असून धारावीत आता केवळ 7 सक्रिय रुग्ण आहेत. धारावीत रविवारी दिवसभरात 3 रुग्ण सापडले आहेत. धारावीत सोमवार, 14 आणि मंगळवार 15 जूनला सलग दोन दिवस रुग्णसंख्या शून्यावर आली होती. त्यानंतर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी प्रत्येकी 1 तर शनिवारी 2 तर आज दिवसभरात 3 रुग्ण सापडले तर दादरमध्ये 6 तर माहीममध्ये 10 रुग्ण सापडले. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होत असून दादरमध्ये 134 तर माहीममध्ये 10 सक्रिय रुग्ण आहेत.























































