गूगल प्ले स्टोरवरील ‘या’ 8 अॅड्रॉइड अॅपमध्ये आढळला खतरनाक व्हायरस, फोनमधून तात्काळ डिलीट करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही जर गुगल प्ले स्टोअरवरून आपल्या अॅड्रॉइड मोबाईलवर विविध अॅप्स डाऊनलोड करत असाल तर सावधान. कारण गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध असणाऱ्या 8 अॅपमध्ये जोकर मालवेअर आढळला आहे. अॅपमधील हा मालवेअर क्विक हील सिक्यूरिटी लॅबने पकडले आहे. हा मालवेअर एवढा खतरनाक आहे की अॅपच्या मदतीने युजरच्या डिव्हाईसमध्ये घुसून तो खासगी माहिती तर मिळवतोच शिवाय बँक डिटेल्सची माहिती घेऊन पैशांची चोरीही करतो.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा मालवेअर युजरच्या परवानगीशिवाय सबस्क्रिप्शन घेतो आणि पैसे उडवतो. या खतरनाक व्हायरसबाबत गूगलला माहिती मिळताच हे 8 अॅप प्ले स्टोरवरून हटवण्यात आले आहेत. परंतु ज्यांनी हे अॅप हटवण्यापूर्वी डाऊनलोड केले आहे त्यांच्यासाठी धोका अद्यापही कायम आहे. त्यामुळे तुमच्याकडेही या 8 अॅपपैकी कोणते अॅप असेल तर तुम्हीही तात्काळ ते डिलीट करा.

कोणते आहे हे अॅप?

1. Auxiliary Message
2. Fast Magic SMS
3. Free CamScanner
4. Super Message
5.Element Scanner
6. Go Messages
7. Travel Wallpaper
8. Super SMS

क्लिक हीलने दिलेल्या रिपोर्टनुसार, हा व्हायरस लॉन्चिंगच्या वेळी नोटिफिकेशन अॅक्सेसच्या बाबत विचारणा करतो आणि याद्वारे एसएमएसची माहिती चोरतो. तसेच हा व्हायरस अॅप्स कॉन्टॅक्ट अॅक्सेस मागतो आणि फोनची माहितीहीी चोरतो. यानंतर अॅप इन्स्टॉल झाल्यावर यातील व्हायरस सर्व माहितीवर नजर ठेवतो आणि चोरी करतो.