दादर येथे आज ‘रास्ता रोको’आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे 25 जून रोजी दादर येथे ‘ओबीसी राजकीय आरक्षण बचाव आक्रोश रास्ता रोको’आंदोलन करण्यात येणार आहे. दादर येथील प्लाझा सिनेमासमोर हे आंदोलन सकाळी ठीक 11 वाजता होणार आहे. या आंदोलनात परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष बापू भुजबळ, उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, रवींद्र पवार, डॉ. डी. एन. महाजन सामील होणार असल्याची माहिती आंदोलनाचे आयोजक सदानंद मंडलिक यांनी दिली. मुंबईतील विविध ओबीसी संघटना आणि ओबीसी समाजाच्या इतर घटकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.