प्राध्यापक पदभरतीवरील बंदी उठविण्यासाठी उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राध्यापक पदभरतीवरील बंदी त्वरित उठवावी आणि 100 टक्के परभरती करावी या मागणीसाठी 5 जुलैपासून शिक्षण संचालक व विभागीय सहसंचालक यांच्या कार्यालयासमोर राज्य नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर 2017 च्या आकृतिबंधाला त्वरित मंजुरी देऊन आजपर्यंतची सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत. सीएचबी प्राध्यापकांची नेमणूक 11 महिन्यांसाठी करून गोवा, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीरच्या धर्तीवर 30 ते 45 हजारांचे मानधन दरमहा देण्यात यावे, तासिका तत्त्वावर सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असल्याचा अनुभव कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरण्यात यावा,  ऑक्टोबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीत बऱयाच प्राध्यापकांचे मानधन दिलेले नाही ते त्वरित दिले जावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिक्षक परिषदेचे शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी पाठिंबा दिला आहे.