
मोटारीतून टेम्पोचालकाचा पाठलाग करून त्यांना अडवून टेम्पो आणि मोबाईलची जबरी चोरी करणाीऱ्या त्रिकुटाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून टेम्पो, मोटार, मोबाइल असा 8 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सागर कैलास नवले (वय 31, रा. राहू) , दौंड सागर बापू मेमाणे (वय 29, रा. मेमाणेवाडी, दौंड) , आणि सुनील जनार्दन ढवळे (वय 28, मेमाणेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाडेबोल्हाई गावच्या हद्दीत 26 जूनला टेम्पोचालकाला अडवून चोरट्यांनी टेम्पोसह मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे यांच्याकडून तपास करण्यात येत होता. त्यावेळी पोलीस अमंलदार समीर पिलाणे आणि बाळासाहेब तनपुरे यांना आरोपी न्हावी सांडस गावच्या हद्दीतील नदीकाठी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्रिकुटाला ताब्यात घेतले. अवघ्या 12 तासात लोणीकंद पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणल्यामुळे कौतुक केले जात आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, मोहन वाळके, वैâलास साळुंके, अजित फरांदे, विनायक साळवे, समीर पिलाणे, सागर कडू, बाळसाहेब तनपुरे यांच्या पथकाने केली.




























































