रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण करून लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील धनकवडी भागात रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने प्रवाशाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरूणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार तरूण मूळचा पालघरचा आहे. कामानिमित्त तो पुण्यात आला होता. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो कात्रज परिसरातून रिक्षाने स्वारगेट एसटी स्थानकाकडे निघाला होता. त्यावेळी तळजाई पठार भागात आनंद भवन सोसायटीजवळ रिक्षाचालकाने साथीदाराला बोलावून तरूणाला बेदम मारहाण केली. त्याच्याकडील 60 हजारांचे दोन लॅपटॉप लांबवून रिक्षाचालक आणि साथीदार पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.