
शरीर मजबूत बनवण्यात हाडांचा महत्वाचा वाटा असतो. वाढत्या वयाबरोबर हाडं कमकुवत होतात. मात्र आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे तरुणांची हाडेही कमकुवत होताना दिसतात. हाडं कमकुवत झाल्याने हात-पाय दुखणे, मुंग्या येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे हाडं कमकुवत करणाऱ्या चुकीच्या सवयी कोणत्या आहेत हे जाणून घेतले पाहिजे.
1. कॉफीचे अति सेवन
अनेकांना दिवसातून आठ ते दहा वेळा कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी प्यायल्याने तरतरी येते असा त्यांचे म्हणणे असते. मात्र कॉफीचे अति सेवन घातक असून यामुळे हाडांमधील कॅल्शियमचा स्तर घटतो. त्यामुळे कॉफी प्या, पण योग्य मर्यादेत.
2. मिठाचे अति सेवन
खाद्यपदार्थांची चव वाढवणाऱ्या मिठाचे अति सेवन करण्याची सवय काहींना असते. भाजीत वरतून मिठ टाकण्याचीही सवय अनेकांना असते. परंतु तुम्हीही जास्त मिठ खात असाल तर सावध व्हा. कारण, मिठाच्या अति सेवनामुळे लवघीवाटे शरिरातील कॅल्शियम वाहून जाते. यामुळे हाडं हळू-हळू कमकुवत बनू लागतात.
3. सॉफ्ट ड्रिंकचे सेवन
फास्ट फूड असो किंवा लंच-डिनर, यासोबत काहींना पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक पिण्याची सवय असते. यात सोडा जास्त प्रमाणात असल्याने याच्या अति सेवनाने रक्तातील कॅल्शियम कमी होते आणि फॉस्फेट वाढते. यामुळे हाडांना योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळत नाही.
4. दारुचे सेवन
तुम्हालाही दारूचे सेवन करण्याची सवय असल्यास सावध व्हा, कारण अल्कहोलच्या सेवनामुळे हाडांना नुकसान होते.
म्हातारपण लवकर नको ? तारुण्य टिकवण्यासाठी ‘हे’ करा 5 आयुर्वेदिक उपाय


























































