
गडचिरोलीत एका पोलीस हवालदाराचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केला आहे. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यत आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गडचिरोलीत पोलीस हवालदाराचा धारदार शस्त्राने खून
गडचिरोलीत एका पोलीस हवालदाराचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केला आहे. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. pic.twitter.com/yfz4jqHmbm— Saamana (@SaamanaOnline) July 5, 2021
जगन्नाथ सिडांम (53) असे हवालदाराचे नाव असुन भामरागड़ तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात ते कार्यरत होते. सिडांम यांच्यावर नागेपली येथे काल राहत्या घरी रात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने चाकुने सपासप वार केले. त्यांना चंद्रपूरमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, विशाल ठाकुर, पोलीस निरीक्षक प्रविण डांगे आणि श्वान पथकासह दाखल झाले असून मारेकर्याचा शोध सुरू आहे.























































