बॉलिवूडमध्ये विम्याचा ट्रेंड; ‘ब्रह्मास्त्र’ला 350 कोटी तर ‘आदिपुरुष’ला 180 कोटींचे सुरक्षा कवच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात केवळ सिनेमाचे नव्हे तर टीव्ही शो आणि वेब सिरीजच्या निर्मात्यांचाही विमा काढण्याकडे कल दिसत आहे. साधारणपणे एका वर्षात 400 सिनेमांचा विमा काढला जात असून 50 ते 350 कोटींपर्यंत विम्याची रक्कम आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा 350 कोटी तर ‘आदिपुरुष’चा 180 कोटींचा विमा काढण्यात आलेला आहे.

सिनेमाचा महागडा सेट, स्टंट, लोकेशन आदीचा विचार करून विमा काढला जातो. साधारणपणे सिनेमाची विमा रक्कम 15 ते 20 कोटी असते. मात्र आता मोठय़ा बजेटचे सिनेमाच नव्हे तर ओटीटी सिरीजचे विमा बजेट वाढलेले दिसत आहे. ‘बाहुबली’ सिनेमाचा 200 कोटींचा विमा होता. ‘फॉरगॉटन आर्मी’ वेब सिरीजसाठी 120 कोटींचा विमा काढण्यात आला आहे. कोणत्याही आर्टिस्टचा अपघात झाला किंवा आजारपण आले आणि शूटिंग थांबले तर विमा मिळू शकतो. मात्र ही अट त्या विमा पॅकेजमध्ये असली पाहिजे.

टर्म इन्शुरन्सला पसंती

कोरोना महामारीत बऱयाच प्रोडक्शन हाऊस कंपन्या आपल्या स्टाफला विमा कवच देत आहेत.  एखाद्या कर्मचाऱयाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना याआधी निर्माते एक निश्चित रक्कम देत होते. मात्र आता टर्म इन्शुरन्सचा ट्रेंड आला आहे. टर्म इन्शुरन्स एका वर्षासाठी असतो. एकाच वेळी 50 जणांचे 25—25 लाखांचे टर्म इन्शुरन्स काढल्याने निर्मात्यावर जास्त भार पडत नाही.

सिनेमा–विमा रक्कम

  • ब्रह्मास्त्र – 350 कोटी
  • आदीपुरुष – 180 कोटी
  • बेल बॉटम – 120 कोटी
  • सर्कस – 120 कोटी
  • जर्सी – 100 कोटी
  • ह्युमन – 50 कोटी
  • फॉरगॉटन आर्मी
  • (बेव सिरीज) – 120 कोटी
  • सिक्स सस्पेक्ट्स
  • (वेब सिरीज) – 65 कोटी