‘बिग बॉस’ टीव्हीच्या आधी ‘वूट’वर! कॉमन मॅनला मिळणार विशेष अधिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोटय़ा पडद्यावरचा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ हा लवकरच भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे बिग बॉस हा रिऑलिटी शो टेलिव्हिजनवर सुरू होण्यापूर्वी वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

यंदाचा सिजन सहा महिन्यांचा असणार आहे.  त्यातील पहिल्या सहा आठवडय़ांचे भाग ओटीटीवर चाहत्यांना 24 तास सातही दिवस पाहता येणार आहेत ज्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरामधील प्रत्येक हालचालीवर लक्ष देता येईल. या वेळी शोमध्ये ‘जनता’ फॅक्टर महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे सहभागी होणाऱया कॉमन मॅनला स्पर्धकांचे स्टे, टास्क, शोमधील त्यांचे अस्तित्व याबाबत निवड करत असामान्य शक्ती मिळणार आहे. एकूण नवीन सिझन प्रेक्षकांना अद्वितीय अनुभव देणार आहे.