जातीनिहाय आरक्षणाला कालमर्यादेची मागणी करणारी याचिका फेटाळली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court

शिक्षणात असलेल्या जातीनिहाय आरक्षणाची कालमर्यादा निश्चित करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. आम्ही सुनावणी घेण्यास इच्छुक नाही, अशा स्पष्ट शब्दांत न्यायालयाने  याचिकाकर्त्याला सुनावले आहे.

एमबीबीएस डॉक्टर असलेल्या सुभाष विजयरन यांनी याचिका दाखल केली होती. शिक्षणात आरक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सांगत कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी केली होती. तसेच अशोककुमार ठाकूर खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांनी आढावा घ्यावा असे बहुतेक न्यायमूर्तींनी म्हटले होते. 13 वर्षांनंतरही आढावा घेतलेला नाही असे याचिकेत नमूद केले. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. यावर सुनावणी घेण्यास इच्छुकच नाही असे बजावले. त्यानंतर याचिका मागे घेण्यात आली.