रत्नागिरीत आणखी एक सेक्स रॅकेट दलाल अटकेत; पिडित तरूणीची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरात आणखी एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरानजीक असलेल्या नाचणे येथील आयटीआय समोरील एका फ्लॅटमध्ये हा वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलिसांनी एका पीडित तरूणीची सुटका केली असून एकाला अटक केली आहे.

नाचणे परिसरातील इमारतीतील एका फ्लॅट मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एक बोगस गिऱ्हाईक पाठवून खातरजमा केली.त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्या फ्लॅटमध्ये पीडित तरूणी आणि वेश्याव्यवसाय करून घेणारा दलाल आढळून आला. रावसाहेब जगन्नाथ माळी (वय 42 रा.भेकराईनगर हवेली पुणे,मूळ राहाणार कासेगाव, सांगली) असे त्याचे नाव आहे.

दलालासोबत एक स्त्री साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब माळी याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि त्यांच्या पथकाने केली.