मोदी-पवार एक तासाची भेट, सहकारी बँकांच्या कायद्यात केलेल्या बदलांवर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. जवळपास तासभर झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने केंद्रात नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार कायद्यांतील बदल आणि बँकिंगसंदर्भातील विषयांवर चर्चा झाली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क वर्तविले जात होते; मात्र शरद पवार यांनी ट्विट करत भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. ही अधिकृत भेट होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या एका पत्रात आपण पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. पंतप्रधानांसोबत यावेळी राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या भेटीदरम्यान सहकार क्षेत्रांतील बदलामुळे सहकारी बँकांसमोर निर्माण होणाऱया समस्या, सहकारासंबंधी कायद्यासंबधी बदलांबाबतचे आक्षेप यासंबंधी सविस्तर निवेदन पवार यांनी पंतप्रधानांना दिले. सहकारासंदर्भातील अधिनियमातील मूलभूत तरतुदींची विसंगती आणि परिणामी कायदेशीर अकार्यक्षमता दाखवू इच्छितो. अधिनियमातील तरतुदी 97 वी घटनादुरुस्ती, राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि सहकाराची तत्त्वे यासंदर्भात नव्यानं करण्यात आलेले बदल विसंगत असल्याकडे पवार यांनी पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधले.

देशाच्या सुरक्षेविषयी चर्चा – जयंत पाटील
‘देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून पेंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले. यावेळी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषायांव देखील चर्चा झाली असण्याची शक्यता जयंत पाटील यांनी बोलून दाखवली. ‘संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवार आणि ए. के. अँटनी यांच्यासोबत काल चर्चा केली होती. त्यामुळे शरद पवारांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयांवर देखील मोदींशी चर्चा केली असेल. शरद पवारांनी सांगितलं होतं की या सगळ्या विषयांवर मी पंतप्रधानांची भेटीसाठी वेळ मागितली आहे आणि मी त्यांची भेट घेणार आहे,’ असे जयंत पाटील यांनी नमूद केले.

सहकार कायद्यांबाबत शरद पवारांची पंतप्रधान मोदींशी चर्चा – नवाब मलिक

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन शरद पवार यांनी भेट घेतली. या बैठकीत विशेष करून सहकारी बँकांसदर्भात जे कायद्यामध्ये पेंद्र सरकारने बदल केले आहेत, त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पेंद्राने कायद्यात केलेल्या बदलामुळे सहकारी बँका आहेत त्यांचे अधिकार कुठे ना कुठे मर्यादित करून आरबीआयला जास्त अधिकार त्यामध्ये देण्यात आले. सहकार हा राज्याचा विषय आहे. घटनेत बदल करून याला स्वायत्ततेचा अधिकार दिला गेला. त्यामुळे या संदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्रकही सादर केले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. याशिवाय, देशातील कोरोना परिस्थिती, अनेक ठिकाणी बंद पडत असलेली लसीकरण प्रक्रिया या संदर्भातही शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शरद पवार यांची दिल्लीत कुठलीही भेट झाली नाही. पंतप्रधान मोदींशी शरद पवारांची भेट होणार असल्याचे काँग्रेस नेत्यांना माहिती होते, असं देखील मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनातील मुद्दे

राज्यघटना सांगते की, राज्यानं लोकांना स्वयंस्फूर्तीनं स्वायत्त, लोकशाही नियंत्रण, व्यावसायिक व्यवस्थापन असणाऱया सहकारातील संस्था उभारण्यास परवानगी दिली पाहिजे. यामुळे लोकांचा सहकारावरील विश्वास वाढेल. पर्यायानं लोकांचा देशाच्या आर्थिक विकासात सहभाग वाढेल.

सहकारी संस्थांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन हा राज्य सरकारांचा विषय आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या नव्या तरतुदींच्या काही कलमांमुळे सहकारी बँकांच्या कामात हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे या तरतुदी असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहेत. त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच आणल्या गेल्या आहेत.

सहकारी बँकिंग हे क्षेत्र राज्यांच्या अधिकार क्षेत्रातील मुद्दा आहे. त्यामुळे केंद्र सरकार बी. आर. अॅक्टमध्ये नव्याने जे बदल करू पाहत आहे ते संसदेच्या कार्यक्षेत्रापलीकडचे आहे.

सहकारसंदर्भातील नवे नियम कायदेशीररीत्या अकार्यक्षम असून या क्षेत्रातील तत्त्वांचा बळी जाऊ शकतो. त्यामुळे सुधारित कायदा अमलात आणताना घटनेत नमूद असलेल्या सहकारी तत्त्वांचा अतिउत्साही नियमांच्या बळावर बळी तर जात नाहीय ना याची काळजी घ्यायला हवी.