
सध्या आपल्याकडे टीव्ही, एसी इतकेच काय कारवाँसारखा रेडियो चालवण्यासाठीही रीमोट असतो. पण लाईट आणि पंख्यासाठी रीमोट नसतो. ज्येष्ठ नागरिकांना यामुळे कधी कधी त्रास होतो, त्यांना उठण्यास जमत नाही आणि लाईट, पंखे बंद करावे लागतात. पण आता लाईट आणि पंख्यांसाठी बाजारात रीमोट उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 600 पासून ते दोन हजार पर्यंत आहेत.
पहिले गॅजेट आहे रेक्टस कंपनीचे. या कंपनीचे एक फॅन रेग्युलेटर आणि एक रिमोट मिळतो. हा रेग्युलेटर आपल्याला पंख्याच्या रेग्युलेटरच्या जागी लावायचा आहे. या गॅजेटचे वैशिष्ट्य म्हणजे याची किंमत 1050 असून तो डिस्काऊंटमध्ये 660 रुपयांना मिळत आहे. रेग्युलेटरसोबत एक रीमोट असून त्यावरून तुम्ही पंखा ऑपरेट करू शकता तसेच या रीमोटमध्ये टायमरचीही सुविधा आहे. रेग्युलेटरवरूनही फॅन ऑपरेट करण्याच्या पर्याय या गॅझेटमध्ये आहे. ऍमेझॉनवर हे गॅझेट उपलब्ध आहे.
दुसरे गॅजेट ऑरा कंपनीचा आहे. या गॅजेटमध्ये एक रेग्युलेटर आणि एक रीमोटचा समावेश आहे. या रीमोटमध्ये एक लाईट आणि फॅन चालवण्याची सुविधा देण्यात आली आहे. या गॅजेटची किंमत 1499 असून ऍमेझॉनवर 799 मध्ये उपलब्ध आहे. ऍमेझॉनवर हे गॅझेट उपलब्ध आहे.
तिसरे गॅजेट डॉट सिस्टम कंपनीचे आहे. डॉट सिस्टमच्या या गॅजेटमध्ये पंखा आणि लाईटसाटी एक रीमोट देण्यात आले आहे. तसेच जास्त लाईट्स आणि पंख्यासाठीही गॅजेट दिले आहे. या गॅजेटची किंमत एक हजार ते 2 हजार २00 पर्यंत आहेत. हे गॅजेट तुम्ही ऍमेझॉनवरून विकत घेऊ शकता.






























































