खूनी हल्ला करून फरारी असलेल्याला अटक; लोणीकंद पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर खूनी हल्ला करून तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. किशोर संजय गायकवाड (वय 19,रा. गोरेवस्ती, वाघोली ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

खूनी हल्ला करून तीन महिन्यांपासून फरारी असलेला आरोपी एका मंदीराजवळ थांबल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे आणि अमंलदार समीर पिलाणे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून किशोर गायकवाडला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, मोहन वाळके, अजित फरांदे, कैलास साळुंके, विनायक साळवे, समीर पिलाणे, सागर कडू, बाळकृष्ण तनपुरे यांनी केली.