लोणीकंद गावाजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाल्याची घटना नगर रस्त्यावर लोणीकंद गावच्या हद्दीत घडली. पवन प्रकाश गीते (वय 18, रा. लोणीकंद, ता. हवेली, नगर रस्ता) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी बालाजी मुंडे (वय 32) यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुंडे यांचा भाचा गीते दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून नगर रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेने खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गीते यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव अधिक तपास करत आहेत.