शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी शिवसेनेच्या वतीने मुंबईतून मदतीचा ओघ सुरू आहे. पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, औषधे तसेच इतर साहित्य पाठवण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, आस्थापना पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत आहेत.

शिवसेना युवासेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 च्या वतीने विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पूरग्रस्तांसाठी शुक्रवारी दुपारी खेतवाडी येथून 6 ट्रक जीवनावश्यक वस्तू, औषधे व इतर सामग्री घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे रवाना करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी, उपनेते राजकुमार बाफना, विभाग संघटक जयश्री बाळ लोकर, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, सुजाता सानप आदी उपस्थित होते.

आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱया माता यशोदा आरोग्य अंक परिवारातर्फे कोकण पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचा धनादेश माता यशोदाचे प्रमुख श्रीकृष्ण हरचांदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव डॉ. सुदिन गायकवाड यांच्याकडे सोपवला. यावेळी नरेंद्र चव्हाण, अवर सचिव रवी जाधव उपस्थित होते.

प्रभादेवीमधील नागु सयाजीची वाडी येथील भाजीपाला मार्पेटच्या वतीने चिपळूण पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली. मार्पेट सदस्यांनी स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर आणि शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली.

मुंबईचे माजी महापौर शिवसेना नगरसेवक प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नगरसेवक निधीतून विभागातील गरजू महिलांना घरघंटीचे वाटप करण्यात आले. यावेळी विभागसंघटक रजनी मेस्त्राr, सुधार समिती अध्यक्ष सदा परब, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, शाखाप्रमुख संतोष गुप्ता, संतोष कदम, शाखा संघटक अंजली जाधव आदी उपस्थित होते.