गजराजाने रेखाटले स्वत:चे चित्र, युझर्सनी केले कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्कसमध्ये आपण हत्तीला फुटबॉल किंवा क्रिकेट खेळताना पाहिले आहे. परंतु सध्या एका हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. कारण यात हत्ती चक्क ब्रश घेऊन कॅनव्हासवर स्वत:चे चित्र रेखाटताना दिसत आहे. हत्तीने इतके सुंदर चित्र काढले आहे की चित्र पाहिल्यावर ते एखाद्या प्राण्याने काढलेय यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा हत्ती चार वर्षांचा असून त्याचे नाव सुदा आहे.

काही मिनिटांच्या व्हिडिओत तो कॅनव्हासवर आधी सोंड काढतो, त्यानंतर शरीराचा पूर्ण भाग काढतो. पाय काढण्यासाठी तो दोन समांतर रेषा रेखाटतो. असे करत तो स्वतःचे संपूर्ण चित्र काढतो. चित्र काढून झाल्यावर गुलाबाची काही फुलं काढतो. सर्वात शेवटी एखाद्या प्रोफेशनल चित्रकाराप्रमाणे एका कोपऱ्यात स्वतःची सही करतो. या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून ‘स्मार्ट हत्ती’ म्हणत युझर्सनी त्याच्या चित्रकलेचे कौतुक केले आहे.