
पंजाबमधील पठाणकोट येथे लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर रणजीत सागर धरणात कोसळले. पायलटला कमी उंचीवर उड्डाण करण्याचे प्रशिक्षण देत असताना ही दुर्घटना घडली. दुर्घटनास्थळाच्या परिसरात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. पायलट आणि त्याचा सहकारी यांचा शोध सुरू आहे. दोघेही सुरक्षित असल्याचे सांगितले जात असून एनडीआरएफ आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.






















































