कोरोना प्रतिबंधक दोन लसीनंतरही बूस्टर डोसच्या कवचाची गरज, कोविड टास्क फोर्समधील तज्ञांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एन्फ्ल्यूएन्झा किंवा फ्लूच्या संसर्गावरील लसींची परिणामकारकता एक वर्षासाठीच असते. त्यानंतर या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा लस घ्यावी लागते. कोरोना विषाणूही याच कुळातील आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे नऊ महिने ते एका वर्षाने बूस्टर डोस देण्याची आवश्यकता राज्याच्या कोविड टास्क फोर्समधील तज्ञ व्यक्त करीत आहेत.

कोरोना लसीचे दोन डोस झालेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्याची मागणी पुढे आली आहे. पण लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची काही उदाहरणे आहेत. रेल्वे प्रवासाच्या संदर्भात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालयानेही बूस्टर डोसबाबत विचारणा केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ञांच्या मते बूस्टर डोसची आवश्यकता लागेल.

आता ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांचे रिसो सर्वेक्षण करून अतिजोखमीच्या क्षेत्रातील पिंवा सहव्याधी असलेले लोक आहेत अशांमध्ये एका वर्षानंतर अॅण्टीबॉडीज कमी झाल्या असतील तर त्यांना बूस्टर डोस देण्याची आवश्यकता आहे का त्याची पडताळणी करावी लागेल.
– डॉ. अविनाश सुपे, राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य