
मुंबई विद्यापीठाने यूजी आणि पीजीच्या अभ्यासक्रमात शिकणाऱया आणि प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. विद्यापीठाने शिक्षण शुल्कात कपातीचा निर्णय घेतला असून कॉलेजमधून घेण्यात येणाऱया विविध शुल्कात कपात केली आहे.
राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक पालकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यातच अनेक पालकांनी वापरात नसलेल्या सोयी-सुविधांसाठीही शुल्क घेतले. याविरोधात विद्यार्थी, पालकांनी तक्रार केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कोणत्याही महाविद्यालयाने एक्स्ट्रा ऑक्टिविटी घेतली असेल तर ते महाविद्यालय 50 टक्के फी घेऊ शकतात.
मुंबई विद्यापीठाने अंडर ग्रॅज्युएट (यूजी) आणि पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) अभ्यासक्रमाच्या फीमध्ये कपात करण्याचे आदेश सर्व महाविद्यालयांना दिले आहेत.



























































