Photo – 72 हेक्टरपेक्षा जास्त जागेत वसलेले आहे हे जगप्रसिद्ध ऐतिहासिक शहर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

600 वर्षे जुनी फॉरबिडन सिटी चीन मधील बीजिंग शहराच्या मध्यभागी आहे. आज, फॉरबिडन सिटीला चिनी भाषेत गु गॉंग म्हणून ओळखले जाते, ह्याचा अर्थ “ऐतिहासिक राजवाडा” असा होतो.

forbiddencity_2_file

1987 मध्ये द फॉरबिडन सिटीला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.

forbiddencity_8_file

72 हेक्टर पेक्षा अधिक असलेल्या या शहरात, 980 इमारती आहेत ज्यामध्ये 8,886 खोल्यांचा समावेश आहे, 22 हेक्टर झोंगशन पार्कसह असंख्य समृद्ध शाही उद्याने आणि मंदिरांनी वेढलेले असे हे आहे.

forbiddencity_7_file

हे शहर 1406 ते 1420 पर्यंत बांधण्यात आले होते, आणि मिंग राजघराण्यापासून (योंगल सम्राटापासून) 1420 ते 1924 दरम्यान किंग राजवंशाच्या समाप्तीपर्यंत चीनच्या सम्राटाचे हिवाळी निवासस्थान होते. हे शहर बांधण्यासाठी दहा लाख कामगार काम करत होते. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर 14 वर्षांनी हे शहर उभारले गेले,
forbiddencity_3_file

“फॉरबिडन सिटी” हे इंग्रजी नाव झिझिन चेंग या चिनी नावाचे भाषांतर आहे, काही संशोधकांनी त्याला जगातील सर्वात मोठा राजवाडा म्हटले आहे.

forbiddencity_5_file

 युनेस्कोने जगातील सर्वात सुरक्षित व प्राचीन लाकडी संरचना असलेले सर्वात मोठे शहर म्हणून घोषीत केले आहे.forbiddencity_4_file

2012 पासून, फॉरबिडन सिटीला दरवर्षी सरासरी 14 लाख पर्यटक भेट देतात आणि 2019 मध्ये 19 लाखाहून अधिक पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली आहे.

forbiddencity_6_file