
राज्य सरकारने आज चार सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या असून फिल्म सिटीच्या महाव्यवस्थापक मनीषा वर्मा यांची कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा हे बीडचे नवे जिल्हाधिकारी असतील. संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. एम. गोंदवले यांची बदली महाडिस्कॉम (संभाजीनगर)चे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पॅडरचे अधिकारी असलेले नीलेश गटणे हे संभाजीनगर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. यापूर्वी ते पालघर जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष होते.
































































