फोटो पाठवण्यापूर्वी एडिट करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपवरून फोटो पाठवण्यापूर्वी अनेक जण ते आधी दुसऱया सॉफ्टवेअरमध्ये एडिट करून पाठवतात. आता मात्र व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉप अॅपवर फोटो एडिटिंग टूल उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे फीचर सध्या मोबाईल अॅपमध्ये उपलब्ध आहे. या नव्या टूलमुळे युझरला फोटो पाठवण्यापूर्वी तो पाहिजे तसा एडिट करता येईल. मोबाईल अॅपमध्ये यापूर्वीच हे टूल समाविष्ट करण्यात आले आहे. नव्या टूलमुळे युझरला फोटोला इमोजी किंवा टेक्स्टची जोड देता येणार आहे. तसेच फोटो पाठवण्यापूर्वी तो क्रॉप किंवा रोटेट करता येणार आहे.