कर्करुग्ण मुलांनी बनवला पाना-फुलांपासून तिरंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून टाटा मेमोरिअल रुग्णालयातील बाल कर्करुग्णांनी पाना-फुलांपासून 75 चौरस फुटांचा इकोफ्रेंडली तिरंगा तयार केला आहे. त्यासाठी झेंडूची फुले, मोगऱ्याची फुले, तुळशीची पाने तसेच सफेद रंगाचे ओरिगामी पक्षी यांचा वापर करण्यात आला आहे. इम्पॅक्ट फाउंडेशन तसेच श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टचे सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला होता.