51 गुन्हे करणारे चार सराईत गुन्हेगार जेरबंद, नगर पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोऱ्या, दरोडे, घरफोड्या व खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चार  सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडली आहे. या गुन्हेगारांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या गुन्हेगारांची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. या घटनेत 4 आरोपींना अटक केली आहे.

कृष्णा भोसले, सुरेश काळे, रावसाहेब भोसले, अजिनाथ भोसले असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट रोजी पहाटे 3 च्या सुमारास फिर्यादी अक्षय गोल्हारयांचे मालकीचे नगर-सोलापूर रोडवरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर अज्ञात 7 ते 8 आरोपींनी दरोडा टाकून मोबाईल, रोख रक्कम असा एकूण अडीच लाख रुपयांचा चोरुन नेला होता. या घटनेबाबत नगर तालूका  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने सर्वा आरोपींना अटक केली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पकडलेल्या या चारही आरोपींवर 2008 सालापासून विविध गुन्हे दाखल होते अनेक गुन्ह्यांमध्ये ते फरार पण होते आरोपी कृष्णा भोसले याच्याविरुद्ध नऊ गुन्हे, दुसरा आरोपी आजिनाथ भोसले याच्याविरुद्ध पंधरा गुन्हे दाखल आहेत तर रावसाहेब भोसले या आरोपींवरुद्ध सर्वाधिक 21 गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी सुरेश काळे याच्या विरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत.

आणखी तिघांचा शोध सुरू

पकडलेल्या 4 आरोपींनी या अगोदर नगर जिल्ह्यामध्ये खून दरोडा चोरी लुटमारी यासह विविध प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे तसेच या घटनेमध्ये त्यांचे अन्य तीन साक्षीदार असून त्याचाही पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितली.