
मराठी क्रिकेट लीग ही स्पर्धा 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी मोठय़ा उत्साहात संपन्न झाली. शेलार मामा फाउंडेशन (सुशांत शेलार) यांच्या सहाय्याने पार पडलेल्या या लीगच्या लढती महेश कोठारे व निर्माती श्रेया योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्य कलाकार, कोरिओग्राफर यांच्यासाठी मराठी क्रिकेट इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या काळातही ही लीग यशस्वी पार पडली. कोरोनाच्या काळात मुंबई क्रिकेट लीगच्या सहाय्याने नृत्यकलाकारांसाठी रेशन कीट उपलब्ध करून देण्यात आले. तसेच त्यांचे मोफत लसीकरणही करण्यात आले. यापुढेही नृत्य कलाकारांना मदत करण्यात येणार असल्याचे या वेळी आश्वासन देण्यात आले.
























































