वीरेंद्र सेहवागचे ई कॉमर्सकडे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याची पावले ई कॉमर्सच्या दिशेने वळली आहेत. ‘व्हीएसबाय सेहवाग’ हा त्याचा अॅक्टीववेअर व स्पोर्टस्वेअर ब्रॅण्ड 2026 सालापर्यंत 5 दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वीरेंद्र सेहवाग मेहनत घेत आहे. याप्रसंगी त्याने ई कॉमर्समध्ये पाऊल ठेवण्याचे जाहीर केले.

नवीन ऑनलाईन स्टोअरमध्ये या ब्रॅण्डचे पोशाख व क्रीडा साहित्य उपलब्ध असणार आहे. त्यामुळे वीरेंद्र सेहवागच्या कोटयवधी चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. तसेच फिटनेसवर अधिक लक्ष देणाऱयांसाठीही हे ब्रॅण्ड महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या ब्रॅण्डचे पोशाख व क्रीडा साहित्य खरेदी करू शकणाऱया इच्छुकांना एका क्लीकवर सर्व काही करता येणार आहे. हे ब्रॅण्ड सध्या मोबाइल वेब व डेस्कटॉपवर (www.vsshop.in) उपलब्ध आहे आणि व्रेडिट/ डेबिट कार्ड्स, वॉलेट्स व यूपीआयसह विविध पेमेण्ट व्यासपीठांसोबत सहयोग केला आहे. ग्राहकांना माध्यमाचे लाभ देण्यासाठी ब्रॅण्ड पुढील 3 महिन्यांमध्ये आघाडीच्या ई-कॉमर्स व्यासपीठांसोबत देखील सहयोग करणार आहे.