सीआयएसएफच्या महिला कॉन्स्टेबलची आत्महत्या, ऍण्टॉप हिल येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऍण्टॉप हिल येथील सीआयएसएफ बॅचलर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्य़ा यास्मिन हैदर अली (27) यांनी राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी ऍण्टॉप हिल पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

मूळच्या उत्तर प्रदेशमधील झांशी येथील असलेल्या यास्मिन हैदर अली या सीएसआसएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. सोमवारी यास्मिन यांच्या पतीने वारंवार कॉल केला. परंतु यास्मिन यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या पतीने यास्मिन यांच्या रूममेटशी संपर्क साधून विचारपूस केली. तेव्हा खोलीचा दरवाजा उघडला असता यास्मिन यांनी आतल्या खोलीत पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. ऍण्टॉप हिल पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.