
भरधाव डंपरचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुंबई- बंगलोर महामार्गानजीक आर्या रेसीडन्सीजवळील रस्त्यावर घडला. याप्रकरणी डंपरचालकाला अटक करण्यात आली आहे. नेमीचंद दुर्गाराम सुथार (वय 52रा. शिवणे) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अब्दुल रझाक इस्माईल शेख (वय 50, रा. कापूरहोळ, भोर) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.
मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास नेमीचंद दुचाकीवर शिवणेत चालले होते. त्यावेळी भरधाव डंपरचालकाने दिलेल्या धडकेत नेमीचंद गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहडग पोलीस तपास करीत आहेत.
खड्डयात दुचाकी पडल्याने तरूण जखमी
पुणे- ओढ्याच्या कामात कोणतेही सुरक्षिततेची काळजी न घेता उपाययोजना न केल्यामुळे दुचाकीस्वार तरूण जखमी झाला. याप्रकरणी पाटील कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 ऑगस्टला रात्री सव्वा अकराच्या सुमारास कात्रजमधील सुखसागरनगरमध्ये घडली. खंडू हनुमंत पुजारी वय 23 असे जखमी झालेल्याचे नाव आहे.


























































