
पाच सेकंदांत कार्डियाक सिटीस्कॅनसह अत्याधुनिक उपचारासाठी विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या इमेजिंग आणि रेडिओलॉजी विभागाला एनबीएच-एमआयएस’ मान्यता मिळाली आहे, अशी मान्यता मिळकणारे नानावटी मुंबईतील एकमेव रुग्णालय ठरले आहे.
राष्ट्रीय रुग्णालय व आरोग्यसेवा पुरवठादार अधिमान्यता मंडळ (एनएबीएच) हे भारतीय दर्जा परिषदेचे घटक मंडळ असून रुग्णालयांना निकष पूर्ण करीत असल्यास आरोग्यसेवांना मान्यता देते. या नुसार नानावटीला मान्यता मिळाल्याचे वैद्यकीय सेवा विभागाचे संचालक व इमेजिंग विभागाचे प्रमुख डॉ. दीपक पाटकर यांनी सांगितले.
अशी आहे यंत्रणा
z नानावटीचा अत्याधुनिक इमेजिंग विभाग 64-स्लाइस कार्डिऍक क्षमतेच्या पेट-सीटी स्कॅनरने सुसज्ज आहे. याद्वारे कार्डिअँक सीटी स्कॅन पाच सेकंदांत पूर्ण होते.
z एमआरआय विभागाकडे 32 चॅनल्सचा रुंद बोअर आहे. कार्डिऍक एमआरआय, एमआर स्पेक्ट्रोस्कोपी, कार्टिलेज मॅपिंग सुविधा आहेत. शिवाय पेडिऑट्रिक सॉफ्टकेअरसह होल बॉडी डेन्सिटोमेट्री करणारा हा देशातील एकमेव विभाग आहे.
– एमबीबीएस डॉक्टर, ओपीडी, रक्तचाचणी, मोफत औषधे, समुपदेशन
























































