शैलजा सुब्रमणियन यांचे मन, संगीतकार म्हणून नवी इनिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध गायिका शैलजा सुब्रमणियन यांनी संगीतबद्ध केलेले ’मन बावरे’ हे मराठी गीत नुकतेच रिलीज झाले आहे. संगीतकार म्हणून शैलजा यांचे हे पहिलेच गीत आहे.

गेली 30 वर्षे स्टेज शो आणि काही तमिळ व मराठी चित्रपट गीतांच्या माध्यमातून शैलजा यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला आहे. त्यांच्या सुमधूर सुरांनी रसिकांना भुरळ घातली. आता त्यांनी संगीतकार म्हणून नवीन इनिंग सुरू केली असून पहिल्यांदा मराठी गीताला संगीत दिले आहे. यासाठी अनुपम घटक यांचे खूप प्रोत्साहन मिळाल्याचे शैलजा यांनी सांगितले. ‘मी मुंबईत लहानाची मोठी झाले. मुंबईने मला भरभरून दिले. त्यामुळेच संगीतकार म्हणून सुरुवात करताना पहिले गाणे मी मराठीच केले,’ असे शैलजा म्हणाल्या.

’मन बावरे झुरे अन् भिरभिरे तुझ्या सवे रे’ हे गीत आशय परब यांनी लिहिले आहे. ते शैलजा यांनीच गायले आहे. प्रमुख अरेंजर अनुपम घटक, बासरी किरण विणकर, कर्नाटीक गिटार अभय नयनपल्ली, लीड गिटार ब्रिजेश शाह, बेस गिटार आदी मिस्त्र्ााr, कीबोर्ड रित्विक घटक, साऊंड मास्टरिंग सेथू रमण आहेत. शैलजा यांच्या गीताचा आनंद युटय़ुब आणि स्पह्टीफायवर घेता येईल.

– ‘माझ्यासारख्या कलाकारांना लॉकडाऊनमध्ये वेगळं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. आमच्यातील कलावंत गप्प बसला नाही. स्वतःमधील प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. संगीतकार म्हणून मिळालेला अनुभव कमालीचा आहे, अशा भावना शैलजा यांनी व्यक्त केल्या.