पुण्यात कुरिअर बॉयच्या बॅगेतून 3 लाखांचा ऐवज चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात कुरिअर बॉयने दुचाकीला अडकवून ठेवलेल्या बॅगेतून दुचाकीस्वार चोरट्यांनी 2 लाख 84 हजारांच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास धायरीतील डीएसके विश्व परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार तरूण कुरिअर डिलीव्हरीचे काम करतो. शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तो डिलीव्हरी देण्यासाठी डीएसके विश्व परिसरात गेला होता. त्यावेळी त्याने जवळील बॅग दुचाकीला अडकवून वस्तू ग्राहकाला देण्यासाठी इमारतीत गेला. त्याचवेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी 2 लाख 84 हजार रूपयांच्या वस्तू असलेली बॅग चोरून नेली.

तरूणाची 50 हजारांची चेन हिसकाविली
रस्त्याने पायी चालत निघालेल्या तरूणाचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजारांची सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना शनिवारी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार अधिक तपास करीत आहेत.