
अफगाणिस्तानातून मंगळवारी हिंदुस्थानात आलेल्या 78 पैकी 16 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. खबरदारी म्हणून सर्व 78 लोकांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. सर्व 16 लोक लक्षणेहीन आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये व्हायरसचे लक्षण नाही. या 16 लोकांमध्ये तीन शिखांचाही समावेश आहे, ज्यांनी काबूलमधून त्यांच्या डोक्यावर श्री गुरुग्रंथ साहिबच्या तीन प्रती आणल्या होत्या. आतापर्यंत 626 लोकांना अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात आणण्यात आले आहे.
























































