देशी-गो उत्पादनांच्या खरेदीची हमी मिळणार; आयुर्वेद गोविज्ञान काऊन्सिल आणि काऊवेद वेलनेसचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशी गोवंश पालकांसाठी खूशखबर आहे. देशी गो-उत्पादनांच्या खरेदीची आता हमी मिळणार आहे. आयुर्वेद गोविज्ञान काऊन्सिल आणि काऊवेद वेलनेस या दोन संस्था संयुक्तपणे पंचगव्य क्रांती अभियान राबवणार आहेत. त्यानुसार आयुर्वेद गोविज्ञान काऊन्सिल ही संस्था गोवंश पालकांना पंचगव्यापासून निर्मित शाम्पू, साबण, फिनाईल, सॅनिटायझर, गोआर्क बनवण्याचे प्रशिक्षण देणार आहे. सदर प्रक्षिणानंतर संबंधित गोपालकाने बनवलेली उत्पादने काऊवेद वेलनेस ही संस्था खरेदी करणार आहे. त्यामुळे गोपालकाला नियमित उत्पादन सुरू होणार असल्याचे आयुर्वेद गोविज्ञान काऊन्सिलचे कार्यकारी संचालक, गव्यशास्त्री डॉ. स्वानंद पंडीत यांनी स्पष्ट केले आहे.

पंचगव्य क्रांती उपक्रम सहकार चळवळीच्या धर्तीवर राबवण्यात येणार असून त्याचा फायदा गोवंश पालकांच्या  कुटुंबातील व्यक्तींना रोजगाराच्या स्वरूपात होणार असल्याचे डॉ. स्वानंद पंडीत आणि काऊवेद वेलनेसचे कार्यकारी संचालक सुनील शिरटावले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली जात आहे. संपर्क – 9850657302.