
राजीव सातव यांच्या निधनामुळे तसेच इतर पाच सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 6 जागांचा निवडणूक कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने जाहीर केला. 4 ऑक्टोबरला सहा जागांसाठी मतदान व निकालही जाहीर होणार आहे.
राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने महाराष्ट्रात एका जागेसाठी पोटनिवडणूक होईल. तृणमूल काँग्रेसचे मानस सिंग भुईया हे पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री बनल्याने त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होईल. थावरचंद गेहलोत यांना पेंद्रीय मंत्रिमंडळातून वगळून कर्नाटकचे राज्यपाल बनविले होते. त्यामुळे मध्य प्रदेशातील पोटनिवडणूक होईल. तसेच आसामच्या बिसवजीत दरमय यांनी राजीनामा दिल्यामुळे तर के.पी. मुनुस्वामी व आर. वैठलिंगम यांनी राजीनामा दिल्याने तामीळनाडूमध्ये पोटनिवडणूक होईल.
























































