वर्सोवा जेटीत पाचजण बुडाले, दोघांचा मृत्यू; एकाचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
drowned

गणेशोत्सव विसर्जना वेळी रविवारी वर्सोवा जेट्टी येथे पाच जण बुडाल्यापैकी आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरू आहे. घटना घडली त्या वेळी पाचपैकी दोघांना स्थानिकांनी वाचवले असून त्यांच्यावर पूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांकडून तिसऱया व्यक्तीचा शोध अजूनही सुरू आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.

मुंबईत रविवारी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी अंधेरीत वर्सोवा येथील जेट्टीजवळ मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या विसर्जन व्यवस्थेपासून काही अंतरावर असलेल्या वर्सोवा गावाजवळ पाटील गल्ली नंबर-2जवळ विसर्जन करण्याची व्यवस्था नव्हती तसेच सुरक्षा व्यवस्था नव्हती तिथे पाच जण बुडाले. त्यापैकी दोघांना स्थानिकांनी तत्काळ वाचवले. मात्र इतर तिघे समुद्रात ओढले गेले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन आणि पोलिसांच्या विशेष बोटीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोध सुरू असताना त्यापैकी आज संजय तावडे (20) आणि शुभम निर्मल (18) यांचे मृतदेह हाती लागले. मात्र तिसऱया व्यक्तीचा शोध सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

गणेशोत्सवात आतापर्यंत मुंबईतील 73 नैसर्गिक स्थळे आणि 173 पृत्रिम तलावांमध्ये सुमारे 1 लाख 58 हजार 229 गणेशमूर्तींचे व 6 हजार 532 इतक्या संख्येतील हरतालिका/गौरी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

एपूण 1 लाख 64 हजार 761 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यापैकी 79 हजार 129 मूर्तींचे विसर्जन हे पृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले तर उर्वरित 85 हजार 632 मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक विसर्जनस्थळी करण्यात आले.

कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या 79 हजार 129 मूर्तींपैकी 75 हजार 687 या घरगुती मूर्ती होत्या तर उर्वरित 3 हजार 502 गणेशमूर्ती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या होत्या. पृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यावर मुंबईकरांनी भर दिला.

एकाला घरी सोडले, दुसऱयाची प्रकृती स्थिर
स्थानिकांनी वाचवलेल्या दोघांपैकी एकाला रविवारी घरी सोडून देण्यात आले असून दुसऱयावर उपचार सुरू आहेत. मात्र त्याची प्रपृती स्थिर असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती पुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.

आता 24 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे. या दरम्यान, भरती आणि ओहोटी येऊन गेल्यामुळे मृतदेह नक्की कुठे सापडेल, हे सांगणे कठीण आहे. मात्र दोघांचे मृतदेह शोधण्यात अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांना यश मिळाले आहे. त्यामुळे तिसरी व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत आमची शोधमोहीम सुरूच राहणार आहे. हेमंत परब, मुंबई अग्निशमन दल प्रमुख