
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिसने रचलेला घातपाताचा कट दिल्ली पोलिसांनी उधळल्यानंतर आता पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘आयएसआय’चे हिंदुस्थानातील नवे कारस्थान समोर आले आहे. सणासुदीत गर्दीच्या ठिकाणी टिफीन बॉक्समध्ये आयईडी स्फोटके पेरून मोठा हल्ला घडवण्याची आयएसआयची तयारी आहे. याबाबत गुप्तचर यंत्रणेने अलर्ट जारी केला आहे.
सणसुदीत खरेदीसाठी मोठी गर्दी होते. याच गर्दीत मोठी जीवितहानी घडवण्यासाठी आयएसआयने मोठय़ा हल्ल्याचे कारस्थान रचले आहे. दहशतवादी देशात घुसखोरी करून दहशत माजवणार आहेत. दहशतवाद्यांचे मनुष्यबळ, शस्त्र्ाास्त्र्ाs आणि कारवायांसाठी आवश्यक पैसा या सगळ्या गोष्टींची आयएसआयने मोठी तयारी आहे, असे गुप्तचर यंत्रणेने अॅलर्टमध्ये म्हटले आहे.
अफगाण दहशतवादी घुसल्याची शक्यता
अफगाण दहशतवाद्यांनीही देशात घुसखोरी केल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच अफगाण दहशतवादी हिंदुस्थानात घुसल्याचे वृत्त आहे. या दहशतवाद्यांकडून लष्करी छावण्या किंवा प्रमुख सरकारी संस्थांवर मोठा हल्ला घडवला जाऊ शकतो, असा सावधानतेचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे.























































