
घरात धनसंपत्ती, सुख-समृद्धी प्रत्येकालाच हवी असते. त्यासाठी सगळेच मेहनत घेत असतात. वास्तुशास्त्रानुसार आपण कोणत्या गोष्टी केल्या तर घरात समृद्धी येईल ते जाणून घेऊया.
– बहुतेक लोकांना पर्समध्ये बऱ्याच गोष्टी ठेवायची सवय असते. पर्समध्ये औषधही ठेवली जातात. असे करणे चुकीचे आहे. औषधे घेतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मकता येईल, म्हणून असे न करणे केव्हाही चांगले.
– महिला अनेकदा पर्समध्ये खाद्यपदार्थ ठेवतात. चॉकलेट किंवा फळे ठेवणे ही बर्याच लोकांची सवय आहे. ही सवय देखील टाळायला हवी, वास्तूनुसार पर्समध्ये अन्नपदार्थ ठेवणे हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे.
– जर तुम्हाला तुमच्या वस्तू इकडे तिकडे फेकण्याची सवय असेल तर ही सवय त्वरित बदला. आपले घर आणि कार्यालय नेहमी व्यवस्थित ठेवा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
– घर असो किंवा कार्यालय वास्तुनुसार क्रिस्टल ट्री, लाफिंग बुढ्ढा यासारखे शोपीस घरात ठेवल्याने घरात धनप्राप्ती होते.
– घर सजवण्यासाठी लोकं वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. अशावेळी घराच्या सजावटींसाठी रोपांचा, झाडांचा वापर केल्यास घराची सुंदरता आणखी खुलते. पण याचबरोबर घरात पैशांच्या समस्या दूर होतात.
– घरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण कायम दुर्लक्ष करतो. घरातील एखाद्या बिघडलेल्या नळातून सतत पाणी गळत राहणे हे वास्तूनुसार चांगले लक्षण नाही. त्यामुळे घरातील पैसा वाहून जातो असे बोलले जाते.
– सूर्याची किरणे थेट घरात येणे हे सकारात्मकतेचे प्रतिक आहे. घरात अंधार करुन ठेवू नका.
– घर नियमीत नीटनेटके असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर घराचा उबंरठाही स्वच्छ असणे गरजेचे आहे. कारण घराच्या दारातूनच लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही.
– घराच्या आजुबाजूला दुषीत पाणी वाहत असेल तर घरात नकारात्मकता येईल. लोकांकडून मान-सन्मान कमी होतो.
– घरातील बागेत काटे असलेली झाडे शक्यतो लावू नये. यामुळे घरात आर्थिक तंगी निर्माण होते.
– घरात किंवा घराच्या आसपास कचरापेटी ठेवू नये. त्याने आर्थिक समस्या येऊ शकतात.
– घराच्या बाहेर वीजेचे खांब असणे अशुभ मानले जाते त्यानेही आर्थिक फटका बसू शकतो.


























































