चाय ऐवजी कॉफी पे चर्चा, आज आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

‘शायद मेरी शादी का खलाय दिल मे आया है… इसिलिये मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है.’ हिंदुस्थानी संस्कृतीत चहाचे महत्व यापेक्षा काय अधिक असू शकेल. लग्न जमवताना चहापोह्यांचा कार्यक्रम होतो.. आपल्या देशात पाहुण्याला चहापानाला बोलावतात. गप्पांची मैफल रंगवायला चहाचीच संगत लागते. मग चाय पे चर्चा तर जोरात रंगतात. काँलेजच्या कँटीनमध्ये चहासोबत गप्पांचा फड जमतो. सकाळी नाक्यावर चहाबाजांचा अड्डा जमतो. पण चहाच्या मैफिलीत आता कॉफीने शिरकाव केला आहे. मित्र- मैत्रिणींना सीडीडी-स्टारबक्समध्ये बोलावून मनसोक्त गप्पा मारायला तरुणाईला आता आवडते. शक्ती चित्रपटातील सीन अनेकांच्या आजही लक्षात असेल. रात्रीच्या वेळेस घरापर्यंत सोडायला आलेल्या अमिताभ बच्चनला घरात येण्यास थेट न सांगता मै कॉफी अच्छी बनाती हूँ अशी प्रेमाची गळ स्मिता पाटीलने घातली होती. हे सर्व सांगण्याचे कारण की आज एक ऑक्टोबरला आंतराष्ट्रीय कॉफी दिवस म्हणजेच इंटरनॅशनल कॉफी डे आहे. चहाची मक्तेदारी मोडीत काढायला आता कॉफी प्रवेश केला आहे. तरुणाईत चहाच्या दुकानांपेक्षा आता कॉफी शाँप्सचा बोलबाला झाला आहे.

पूर्वी चर्चगेट स्टेशनच्या बाहेर टी सेंटर होते. चहाचे प्रमोशन करण्यासासाठी केंद्र सरकारच्या खात्याचे हे दुकान होते. वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य चहा टी सेंटरमध्ये मिळत. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून अनेक दिग्गज राजकारणी मंडळींचा आणि हायप्रोफाईल लोकांचा हा गप्पांचा टी सेंटर म्हणजे अड्डा होता. पत्रकारांचाही टी सेंटरमध्ये राबता होता. पण काळाच्या ओघात टी सेंटर बंद पडले. चहाबाजांसाठी आता प्रेमाच्या चहापासून येवले चहा असे नवनवीन अड्डे तयार होत असताना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आणि टाटासारख्या बड्या कंपनीने स्टार बक्ससारखा कॉफी शाँपचा ब्रँड आणला आहे. या ब्रँडची तरुणाईला भुरळ पडली आहे. एसीची थंडगार झुळूक, त्यात दरवणारा कॉफीचा मंद सुगंध जोडीला मंद संगीत, नजरेला सुखावणारे इंडिरियर, फ्री वायफाय आणि एक कॉफी घेऊन कितीही तास मनसोक्त गप्पा मारण्याची मुभा. यामुळे
तरुणाईला सीसीडी-स्टार बक्ससारख्या कॉफी शाॅपची भुरळ पडली. काँर्पोरेट सेक्टर, वकिल मंडळींच्या महत्वाच्या मिटिंगही कॉफी शाँप्समध्ये होतात. चला आता उठा असे सांगायला कोणी येत नाही. कोणी कोणाच्या टेबलवर डोकावून बघत नाही. प्रत्येक जण आपल्या गप्पा आणि मिटिंगमध्ये दंग असतो. त्यामुळे चाय पे चर्चा ऐवजी कॉफी पे चर्चा असा ट्रेंड येऊ लागलाय. कॉफी

शाँपमधील फ्रापे, कॅपेचिनो, मोका, लाते, एक्सप्रेसो, अमेरिकानो,माकियाटो अशा काँफीच्या विविध ट्रेंडी नावांची तरुणाईला भुरळ पडली आहे. म्हणूनच अगदी 100 रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत कॉफीसाठी सहजपणे मोजतात.

तरीही फिल्टर कॉफीच

पण मुंबईतल्या दाक्षिणात्य हाँटेलच्या मालकांच्या मते मोठ्या ब्रँडची कॉफी शाँप्स आली असली तरी फिल्टर कॉफीला अजूनही प्रचंड मागणी आहे. आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या कॉफी शाँपच्या चेन्सनी देशातील मोठ्या महानगरात शिरकाव केला. काँर्पोरेट आणि हायफाय मंडळी, श्रीमंत वर्गातील तरुणाईची पावले आपसूक सीसीडी, बरिस्ता, स्टार बक्ससारख्या शाँप्सकडे वळली. ब्रँडेड कॉफी

शाँपमधील क्लासिक कॉफीचे ग्राहक वेगळेच आहेत. पण फिल्टर कॉफी प्रेमींची संख्या अधिक आहे. असे शिवाजी पार्कच्या राजाराजेश्वरी हाँटेलचे मालक राजाराजेश्वरी हाँटेलचे मालक हंसराज चौटा(अनुसेठ) सांगतात. त्याची प्रचिती माटुंग्यात फेरफटका मारल्यावर येते. माटुंग्यात दाक्षिणात्य मंडळी आणि दाक्षिणात्य हाँटेलची संख्या अधिक आहे. माटुंग्यात दरवणारा कॉफीचा सुगंध सहजपणे अनुभवता येतो. माटुंग्यातील मणीजची कॉफी प्यायला शिवाय रुईया काँलेजच्या नाक्यावरच्या अनेकांचा दिवस मावळत नाही. कॉफी शाँप्सचे कितीही मोठे ब्रँड आले तरी फिल्टर कॉफीची मागणी 100 टक्के कायम असल्याचे हंसराज चौटा म्हणाले.

कॉफीत चिकोरी

प्युअर कॉफीची चव अतिशय कडवट असते. ती पिता येणार नाही. त्यामुळे त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी चिकोरीच्या बिया ग्राईंड करून मिसळल्या जातात असे हंसराज सांगतात

  • वाफाळती कडक फिल्टर कॉफी
  • जशा प्रकारे अस्सल चहाबाजांची तल्लफ कॉफीवर

भागणार नाही तशीच फिल्टर कॉफी

प्रेमींची काँफीची तल्लफ फ्रापे, कॅपेचिनोवर भागणार नाही. स्टीलच्या छोट्याशा पेल्यातील कडक, वाफाळत्या फिल्टर कॉफीची मजा औरच आहे. म्हणूनच आजचा एक दिवस तरी चहा ऐवजी कॉफी काफी है असे म्हणायला हरकत नाही.