संगमेश्वर – उमरे धरणात एकाचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर जवळच्या उमरे येथील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. संदेश धोंडीराम मोहिते असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे

सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील उमरे बौद्धवाडी तिघेजण आंघोळी साठी उमरे धरणात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही जण बुडत असल्याचे पाहताच शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थानी दोघांना वाचवले तर एकाचा बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहिती नुसार उमरे येथील संतोष आग्रे, (49) सागर मोहिते (28) आणि संदेश धोंडीराम मोहिते वय अंदाजे 36 हे तीघे नेहमीप्रमाणे दुपारी उमरे धरणात अंघोळीला उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने संदेश मोहिते या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे, तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे.

बुडालेल्या इसमाचा ग्रामस्थ शोध घेत असुन घटनेची खबर मिळताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, कामेरकर हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.