
लहान मुलांच्या खोलीत सहसा विविध गेम्स, फळांचे—प्राण्यांचे चार्ट दिसतात. ब्राझीलच्या निकोल ऑलिवेरा हिच्या खोलीत मात्र सोलार सिस्टीम, चंद्र-सूर्य, आकाशगंगा, कृष्णविवर यांचे पोस्टर दिसतात. म्हणूनच वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी करामत दाखवत निकोलने 18 लघुग्रह शोधले आहेत. ती सर्वात लहान वयाची खगोलशास्त्र्ाज्ञ ठरली आहे.
नासा आणि ब्राझील मिनिस्ट्री ऑफ सायन्स सिटिजन यांनी एकत्रितपणे सायन्स प्रोग्रॅमचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी होत निकोलन एक, दोन नव्हे तर तब्बल 18 लघुग्रहांचा शोध लावला. याआधी हा रेकॉर्ड 18 वर्षांच्या लुईस अमिनो हिच्या नावावर होता. शोधून काढलेल्या या लघुग्रहांना निकोल आता आपले आई-बाबा, बहीण, भाऊ, मित्रमंडळी आणि ब्राझीलच्या खगोलशास्त्र्ाज्ञांची नावे देणार आहेत. निकोलला ग्रह- ताऱयांची, अंतराळाची ओढ आहे. मोठे झाल्यावर रॉकेट बनवण्याचे तिचे स्वप्न आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये तिला काम करायचंय, असे निकोलच्या आईने सांगितले.


























































